जेरूसलेम – इस्रायलमध्ये नेफ्टाली बेनेट यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारचा उदय झाला आहे. नवीन सरकारच्या शपथविधीबरोबरच बेंजामिन नेत्यान्याहू यांची 12 वर्षांची कारकीर्दही झाली आहे.
या नवीन सरकारमध्ये डाव्या, उजव्या आणि मध्यममार्गी अशा सर्व विचारांच्या पक्षांचे सदस्य असणार आहेत. त्यामुळा हे खऱ्या अर्थाने एक आघाडी सरकार असणार आहे. आघाडीमध्ये अरब पार्टी देखील सहभागी असणार आहे.
नेतन्याहू यांच्या विरोधी आघाडीला 60 प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला तर तर नेतन्याहू यांना 59 प्रतिनिधींचा. नेतन्याहू सरकारमध्ये नसले तरी ते लिकुड पक्षाचे प्रमुख आणि इस्रायली संसदेचे नेते तसंच विरोधी पक्षनेते राहतील. दरम्यान, नव्या सरकारमध्ये 27 मंत्री असून त्यातील 7 महिला आहेत.
विशेष म्हणजे नेफ्टाली बेनेट यांचा पक्ष सात खासदारांसह पाचव्या क्रमांकावर आहे, परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीत ते किंगमेकरच्या भूमिकेत होते आणि म्हणूनच त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यामिना पक्षासह आणखी तीन पक्ष आहेत ज्यांचे प्रत्येकी सात खासदार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- WTC चा अंतिम सामना जिंकणाऱ्या टीमला मिळणार ‘एवढी’ रक्कम
- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार; उदयनराजे, राणे की प्रीतम मुंडे? जाणून घ्या कोणाची लागणार वर्णी..
- कोरोना लस घेण्यास मुस्लीम समाजातील लोक टाळाटाळ करतात ?
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा
- ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करा, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे निर्देश!


