Share

पोलिसांचे पथसंचलन! लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस करणार कडक अंबलबजावणी

Published On: 

औरंंगाबाद : कोरोनाच्या संसर्ग काळात मुस्लिम समाज बांधवांची रमजान ईद शुक्रवारी (दि.१४) मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली.  सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पाश्र्वभूमीवर क्रांतीचौक पोलिसांनी शहरात पथसंचलन केले. येत्या काळात पोलिसांकडून नियमांची कडक अंबलबजावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या पथसंचलनाचे नेतृत्व पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ.गणपत दराडे, अमोल देवकर यांनी केले.

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोना संसर्ग काळातच रमजान ईद साजरी करण्यात आली. रमजान ईद आणि सध्या शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पाश्र्वभूमीवर  पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ.गणपत दराडे, अमोल देवकर, वाहतूक शाखेचे निरीक्षक मुवुंâद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पथसंचलन करण्यात आले.

क्रांतीचौक पोलिस ठाण्यापासून पथसंचलनास सुरूवात झाली. सिल्लेखाना, सावरकर चौक, निराला बाजार, पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक या मार्गावर पथसंचलन करण्यात आले. पथसंचलनात राज्य राखीव दलाचे जवान, दंगा नियंत्रण पथक, क्युआरटी पथक, जिन्सी पोलिस ठाण्याचे पथक यांच्यासह दंगा नियंत्रण वाहन वङ्का आदी सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!