औरंंगाबाद : शहरात शून्य ते अठरा वयोगटातील हरवलेल्या, अपहरण केलेल्या बालकांचा आता शहर पोलीस दल ‘ऑपरेशन मुस्कान १०’ राबवत शोध घेणार आहे. महिनाभर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंबंधीचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी मंगळवारी (दि.१) काढले आहे.
आदेशात म्हटल्याप्रमाणे, शहरात बेघर, आश्रय गृह, अशासकिय संस्था, रेल्वे स्थानके, बस स्थानके, रस्त्यावर भीक मागणारी मुले, वस्तु विकणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मीक स्थळे, रुग्णालये, हॉटेल्स, दुकाने आदी ठिकाणी काम करणारी मुले अशा बालकांना हरवलेली मुले असे समजुन त्यांचे पालकांचा शोध घेण्यात येणार आहे. शोध लागलेल्या बालकांना ताब्यात घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
ज्या बालकांचे पालकांचा शोध घेवुनही ते मिळाले नाहीत अशा बालकांना बाल सुधारगृहात ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या मोहिमेसाठी पोलीस आयुक्तालय शहर हद्दीतील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी त्यांचे अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या जापु पथकातील अधिकारी व कर्मचा-यांचे पथक यासाठी नेमावे अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहे. शहरवासियांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संजय राऊतांच ‘ते’ आमंत्रण आम्ही स्वीकारतो; आशिष शेलारांच्या विधानाने उत्सुकता वाढली
- ऱ्हदयद्रावक! मायलेकीसह पुतणीचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू
- अजब ! 5G याचिकेवरील सुनावणीवेळी जुही चावला लागल्या गाणी गायला, कामकाजात आणले व्यत्यय
- एकच धून…६ जून ! शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य होण्यासाठी संभाजीराजेंनी जाहीर केली लिंक
- ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ तीन मोठे निर्णय


