बीड : करुणा शर्मा प्रकरणाने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात खळबळ उडाली आहे. करुणा शर्मा यांनी परळीमध्ये प्रवेश केल्यानंतर तर थेट जेलमध्ये जाईपर्यंत परळी पोलिसांनी जी भूमिका निभावली तिच मुळात संशयास्पद असल्याचे दिसून आले आहे. करुणा यांच्या वाहनात बंदूक सापडल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. मात्र, त्या संदर्भातील गुन्हा त्यांनी वाहन चालकावर दाखल केला आहे. मुळातच बंदूक गाडीमध्ये ठेवतानाची क्लिप राज्यभरात व्हायरल झाली आहे. तरीही परळी आणि बीड पोलिसांना त्याचा पत्ता लागला नाही.
धनंजय मुंडे कुटुंबीयांच्या जीविताला करूणा शर्माकडून धोका होता तर तिला परळीत पोलिसांनी कसे जावू दिले? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेने परळी पोलीसांना पुर्णत: उघडे पाडले आहे. या प्रकरणात पोलीस अधिक्षकांनी पत्रकार परिषद घेवून पोलीस दलाच्या इभ्रतीचे धज्जे उडवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्रकारांनी यामध्ये प्रश्न विचारल्यानंतर पोलीस अधीक्षक देखिल निरुत्तर झाले.
करुणा शर्मा प्रकरणात रविवारी परळीत ज्या काही घडामोडी घडल्या, त्या सर्व घटनाक्रमाची माहिती बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी दिली. मात्र काही गुंतागुतींच्या अन् थेट प्रश्नांवर एसपी निरुत्तर झाले. त्यांनी केवळ सर्व बाजुंनी तपास केला जाईल असे सांगत अधिक बोलणे टाळले. शिवाय परळी शहर पोलिसांचा निष्काळजीपणा झाला असेल तर त्यांचीही चौकशी केली जाईल असे उत्तर दिले.
मात्र करुणा शर्मा यांना परळीत दाखल झाल्यापासून बंदोबस्त दिला गेलेला असताना परळीत त्या आल्यानंतरच त्यांच्या वाहनाची तपासणी का झाली नाही, शिवाय त्यांच्या चालत्या कारची डिक्की उघडून त्यात काही तरी ठेवून पुन्हा डिक्की बंद करणारे लोक नेमके कोण? अन् हा सर्व प्रकार पोलिसांसमोर झालेला असतानाही पोलिसांनी कोणताही विरोध का केला नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना ‘तपासात सर्व काही स्पष्ट होईल’ इतकेच उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे समाज माध्यमावर व्हायरल झालेला परळीतील वाहनाचा व्हिडीओ अन् त्यानंतर पोलिसांना स्वत:ची बाजू मांडताना आलेले अपयश लक्षात घेता बीड पोलीस या प्रकरणात उघडे पडल्याची चर्चा होत आहे.
३०७ च्या गुन्ह्याबाबत संशयकल्लोळ
करुणा व अरुण मोरेंनी चाकूने हल्ला करून महिलेला जखमी केले. ही जखम मोठी असल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिले. त्यामुळे ३०७ कलम लावल्याचे एसपी आर. राजा यांनी सांगितले तर, दुसरीकडे स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता भास्कर खैरे यांनी आम्ही असे कुठलेही प्रमाणपत्र दिले नाही, रुग्ण सध्या उपचाराखाली आहे. सुटीनंतर प्रमाणपत्र दिले जाते, असे सांगितले. त्यामुळे एसपींचा दावा किती फोल आहे हे समोर आलेच शिवाय पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह अधिक गडद झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात नवीन रेल्वेमार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरण पूर्ण करणार; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराडांचे आश्वासन!
- ‘भाजपाकडे लाचखोर नवऱ्याची बायको, हे चित्र लोकांना विचित्र वाटते!’, मेहबूब शेख यांचा हल्लाबोल सुरूच
- औट्रम घाटा पाठोपाठ गौताळा घाटात कोसळली दरड; वाहतूक विस्कळीत
- ब्राह्मण समजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक
- केंद्राने महाराष्ट्राला दिलेला इशारा गणेश मंडळांनी पाळला पाहिजे – राजेश टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

