वैजापूर : वैजापूर शहरातील जुन्या बसस्थानक परिसरातील वृत्तपत्र विक्रेते तथा पत्रकार दिपक बरकसे यांना शनिवार (दि.२७) रोजी वैजापूर पोलीस ठाण्याच्या एका सहायक पोलीस निरिक्षकाने अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. नीलेश केळे असे शिवीगाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पत्रकार दीपक बरकसे, रा.जीवनगंगा कॉलनी हे जुना बसस्थानक परिसरात वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी ते नेहमीप्रमाणे स्टॉल वर वृत्तपत्र विक्री करीत होते. दरम्यान दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कडाक्याचे ऊन असल्याने त्यांना तहान लागली. त्यावेळी पाणी पिण्यासाठी तोंडावर लावलेली मास्क त्यांनी काढले.
याचवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश केळे हे व इतर पोलीस कर्मचारी वाहनात त्याठिकाणी आले व तू मास्क का नाही लावला ? अशी विचारणा दीपक यांना केली. शिवाय काही समजण्या अगोदरच केळे यांनी दीपक यांना अश्लील भाषेत शिव्यांंची लाखोली वाहण्यास सुरुवात केली.
सदरील घटनेचा वैजापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. वृत्तपत्रविक्रेते तथा पत्रकार यांनाच पोलीसांकडून अशी वागणूक मिळत असेल तर सामान्यांचे काय? जर चेहऱ्यावर मास्क लावलेला नसेल तर कायदेशीर दंडात्मक कारवाई करता येत नाही का ? मास्क नसल्यास नागरिकांना शिवीगाळ करण्याची मुभा पोलीसांना कुणी दिली ? असे अनेक प्रश्न शनिवारी वैजापूरकरांनी समाजमाध्यमांंवर उपस्थितीत केले.
जर कुणी मास्क लावलेला नसेल तर त्याच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. घडलेल्या घटनेबाबत मला अद्याप संपूर्ण खुलासा झालेला नाही. याविषयी सपोनि केळे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून खुलासा करतो. पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- दारुचा मोठा साठा सेलू पोलिसांनी पकडला, गुन्हा दाखल
- ‘अनुसूचित जातीची आहेस’ असे हिणवत विवाहितेचा अमानुष छळ
- ‘हॉटस्पॉट’ वसाहतींमध्ये निर्जंतुकीकरणाची जबाबदारी कोणाची?
- भारत नानांच्या मुलाला आमदार करणारच! भगीरथ भालकेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर
- ‘बांगलादेश लढ्यात मोदींना नेमकी कधी अटक झाली होती? ती माहिती दिल्यास…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

