Share

बस इतना याद रखना…हिसाब तो होगा, इंटरेस्ट लगा के! – नितेश राणे

Published On: 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.

दुसरीकडे, महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये टीकेचं युद्ध सुरु झालं आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात आवाज उठवल्यामुळे गोस्वामीवर ही कारवाई सूडबुद्धीने केली गेल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील या प्रकरणानंतर नाव न घेता डायलॉगबाजी करत ठाकरे सरकारला आव्हानात्मक इशारा दिला आहे.

नितेश राणे यांनी, “सत्ता आज आहे, उद्या नाही…आज तुमची आहे, उद्या आमची असणार.. फक्त एवढं याद राखा! हिशोब तर होणारच…व्याजासकट!” असं ट्विट करून महाविकास आघाडीवर प्रहार केला आहे.

काय आहे हे प्रकरण?

अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आपण हे पाऊल उचलत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी मृत्युपुर्वीच्या पत्रातून केला होता. मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्याने पोलिसांची दीड तास हुज्जत घातली. त्यामुळे पनवेल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अर्णब गोस्वामी याला अलिबाग न्यायालयात हजर केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!