🕒 1 min read
मुंबई:- अवघ्या जगावर गेल्या वर्षभरापासून कोरोनाचं सावट आलं आहे. या रोगावर लस बनवण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांनी आटापिटा केला. सुमारे ८ महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर जगभरात शास्त्रज्ञांना यश आलं. देशातील सिरम इन्स्टिट्यूटने पहिली लसीचा मान मिळवल्यानंतर या कंपनीचे जगभरात कौतुक केले गेले.
मात्र, एक धक्कादायक वृत्त समोर येत असून पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. पुण्यातील मांजरी परिसरातील सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. या नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली हे मलाही व्हॉट्सॲप मेसेज आणि सोशल मीडियावरुन समजलं. पण ही आग लागली आहे की लावलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विनापरवाना ऊसगाळप केल्याने उस्मानाबादमधील जयलक्ष्मी शुगर्सला 35 लाखांचा दंड
- शरद पवारांचा एक फोन आणि इंडियाचं विमान मुंबईत लँड
- ‘वाटले होते गड्या आपला गाव बरा, पण तुम्ही म्हणले पसारा भरा’, पराभूत उमेदवाराचे अजब बॅनर
- …म्हणून अजूनही व्हॅनिटी व्हॅन मध्ये आमच्या त्याच टॅक्सीचा फोटो मी लावलेला आहे
- गुड न्यूज : जिओने बदलला ‘ हा ‘ रिचार्ज प्लॅन…

