Share

पुर्णा येथे २४ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

Published On: 

परभणी : पूर्णा शहरातील मुख्य बाजारपेठेसह अन्य चौक व रस्त्यांवर ठाण मांडून व्यवसाय करणार्‍या हातगाडेवाल्यांसह २४ विक्रेत्यांविरूध्द पोलिस प्रशासनाने शुक्रवारी कारवाई करीत न्यायालयात खटले दाखल केले आहेत.

पूर्णेतील बहुतांशी रस्ते, चौक हे विक्रेत्यांच्या अतिक्रमणाने खुप लहान झाले आहेत. परिणामी, वाहनधारकांना ये – जा करताना दररोज कसरती कराव्या लागत आहेत. हातगाडेवाले थेट रस्त्यावर तर काही दुकानदारांनीसुध्दा नाल्यांवर, ओट्यांच्या पुढे आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. या वेळी पोलिस कर्मचार्‍यांनी रस्त्यावर साहित्य ठेवलेल्या व्यापार्‍यांविरूध्द कारवाई केली. 24 दुकानदारांविरूध्द थेट कारवाई करण्यात आली.

या कारवाईमुळे सर्व व्यापारी धास्तावले आहेत. तर वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या रस्त्यावर खुप मोठ्या प्रमाणात वाहनांची ये – जा असते. परंतू वाढलेल्या अतिक्रमणामुळे येथे मोठ्या प्रमाणात अपघात देखील होतात. तर हे अतिक्रमण करणाऱ्यांवर दाखल केलेल्या गुन्हामुळे आता व्यापारी हे अतिक्रमण काढून घेतील आणि या रस्त्यावर अपघाताला आपोआप प्रतिबंध बसणार यात मात्र शंका नाही. तर व्यापारी मात्र या कारवाईने खुपच धास्तावले आहेत. परंतू ही कारवाई करणे खुप गरजेचे असल्याचे या वेळी पोलिसांच्या सुत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!