🕒 1 min read
कोल्हापूर: जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंगपूर येथे मिरवणूक काढल्यामुळे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावर (Minister of State for Health Rajendra Patil Yadravar) यांच्यासह एकूण ४०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच जेसीबी ने गुलालाची उधळण केल्याप्रकरणी रणवीर गायकवाड यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यात अन्य तालुक्यातील नेते आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणूक जल्लोषानंतर पोलीस प्रशासन आता अलर्ट झाले आहे.
दरम्यान या निवडणुकीत मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा ४७ मतांनी विजयी झाला.त्यांना ९८ मते मिळाली. विरोधी गणपतराव पाटील यांना ५१ मते मिळाली. तर, पन्हाळा गटातून आमदार विनय कोरे विजयी झाले. तर शाहूवाडी विकास संस्था गटातून रणवीर मानसिंगराव गायकवाड. आजरा गटातून राष्ट्रवादीचे सुधीर देसाई, गडहिंग्लज संतोष पाटील विजयी झाले.
महत्वाच्या बातम्या:
- ‘मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा, महापौरांच्या मुलाला…’, सोमय्यांचा आरोप
- ‘महाजनांना बुधवार पेठेत दाखवा’; एकनाथ खडसेंची घणाघाती टीका
- भारतीय जवानांच्या धैर्यापुढे साक्षात हिमालय सुद्धा झुकला; व्हिडीओ व्हायरल
- पुण्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ; महापौर म्हणाले…
- ‘राबडीदेवी म्हटलं फूलन देवी नाही’; रश्मी ठाकरेंवरच्या ‘त्या’ व्यक्तव्याला चंद्रकांत पाटलांचे समर्थन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
