Share

‘मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा, महापौरांच्या मुलाला…’, सोमय्यांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दोन दिवसांपूर्वी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी १० दिवसांमध्ये ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा केला होता. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळ्याचा गंभीर आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच यावेळी यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांच्यावरही निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना सोमय्या म्हणाले की,’वरळीतील कोविड सेंटरचे काम किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या कंपनीला देण्यात आले असून कंत्राट मिळाल्यानंतर कंपनी तयार करण्यात आली आहे.’ तसेच उद्धव ठाकरेंच्या सेनेला कोविड सेंटर हे कमाईचे साधन आहे. म्हणून ओमायक्रॉन बाधितांचा आकडा वाढवून सांगतात’, असे सोमय्या म्हणाले आहेत.

पुढे किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाणा साधत सोमय्या म्हणाले की,’मुंबईच्या महापौर किरीट सोमय्या गांजा पिऊन बोलत असल्याचे म्हणतात. हो गांजा पिऊन हे बोलतोय की किशोरी पेडणेकर यांनी स्वतःच्या कंपनीला कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट दिले आहे. मुंबई महापालिकेचे कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट मिळालेल्या कंपनीची स्थापना किशोरी पेडणेकरांनी केली. सध्या त्यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर ही कंपनी चालवत आहे. वरळी येथील डोममधील कोविड सेंटरचे कंत्राट त्यांच्याकडे आहे.’ तसेच लोकांच्या जीवाशी खेळण्याचे पाप ठाकरे सरकारने केले आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, घाबरवणे हे आमच्या रक्तात नाही आणि आम्हीसुद्धा घाबरत नाही. खुर्चीत गांजा मारून कुणालाही बोलता येते. परंतु परिस्थिती तपासून पाहताना आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला धाडस दिलं आहे. उद्याच्या मृत्यूला मी घाबरत नाही. त्यामुळे तेवढं धाडस आपण दाखवावे,असे पेडणेकर म्हणाल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!