Share

‘राबडीदेवी म्हटलं फूलन देवी नाही’; रश्मी ठाकरेंवरच्या ‘त्या’ व्यक्तव्याला चंद्रकांत पाटलांचे समर्थन

Published On: 

मुंबई: भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया (Jiten Gajaria) यांनी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या विरोधात ट्वीट करताना ‘महाराष्ट्राची राबडी देवी’ असे शब्द वापरले होते. जितेन गजारिया यांच्या या आक्षेपार्ह ट्वीटवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणावरून राज्यातील राजकारण देखील चांगलेच तापले होते. यावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी समर्थन दर्शवले आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, एकंदरीत माझा तो बळवंतराव दुसऱ्यांचा तो बाब्या, असं महाविकास आघाडी सरकारचं चाललंय, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी आणि नेत्यांनी महिलांबद्दल काहीही बोललं तरी चालतं, पंतप्रधानांवर टीका केली तरी चालते. पण भाजपामधील मंत्र्यांनी एक शब्द जरी बोलला तरी त्यांच्यावर कारवाई होते, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे रश्मी ठाकरे या देखील राबडीदेवी यांच्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळू शकतात, त्यामुळे राबडीदेवी म्हणून गजारिया यांनी रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली, फूलनदेवी म्हटलेलं नाही, त्यामुळे वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, याप्रकरणी आम्ही त्यांना समज दिलीय. भाजपाची महिलांबद्दल योग्य शब्दांत बोलण्याची संस्कृती आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!