नवी-दिल्ली : सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे बघायला मिळत असून यामध्ये एक जवान बर्फाच्या वादळात आपले कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे दिल्ली आणि लगतच्या भागात पाऊस पडत आहे. हिवाळा ऋतू आला आहे. जे आपली जॅकेट काढून छाती रुंद करून बाहेर आले होते, ते पुन्हा रजाईत गेल्याचे आढळतील किंवा तुम्ही कुठेतरी शेकोटी पेटवून चहा घेत असाल. वीकेंड कर्फ्यू लागू आहे. अशा परिस्थितीत लोक बहुतेक घरात असतात. पण थंडीने ओरडत बसण्यापेक्षा चांगले आहे की, तुम्ही या भारतीय जवानाचा व्हिडिओ बघावा. कदाचित हा व्हिडीओ बघून तुम्हाला हिवाळा काय आहे हे लक्षात येईल. भारतीय जवानांच्या धैर्यापुढे साक्षात हिमालय सुद्धा झुकला हेही बघायला मिळेल.
या व्हिडिओतील सैनिक हा अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यांतर्गत येणाऱ्या रिधोरा गावातील असून परिस्थितीला न घाबरता हा भारतीय सैनिक हातात रायफल घेऊन बर्फाच्या वादळात उभा आहे. व्हिडिओमध्ये हा सैनिक एका टावरचे रक्षण करीत असून वादळातही तो न डगमगता आपले कर्तव्य बजावत आहेत. तसेच हा व्हिडीओ श्रीनगर सीमेवरचा असून सध्या समाज माध्यमांवर हा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सदाभाऊ खोत यांच्या टीकेवर पेडणेकरांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या…
- सिंधुताईंची अपूर्ण इच्छा होणार पुर्ण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली दखल
- जिम आणि ब्युटी पार्लरवरील निर्बंधात शिथिलता; जाणून घ्या सुधारित निर्बंध
- गोव्यात काँग्रेसच्या सक्षम नेतृत्वाअभावी १७ चे २ आमदार झाले-संजय राऊत
- “तुम्ही ज्या रुग्णालयाचे उद्घाटन करताय ते आम्ही यापूर्वीच केलेले”, ममतांचे मोदींसमोरच विधान

