औरंंगाबाद : दिरासोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा बहिणीच्या मदतीने सुपारी देऊन हत्या करणाऱ्या सात मारेक-यांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बारा तासात गजाआड केले. गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास पाचोड भागातील देवगाव येथे अशोक बाबासाहेब जाधव (वय ५०, रा. कडेठाण बु.ता. पैठण) यांचे हातपाय बांधलेले प्रेत आढळून आले होते.
रंजना अशोक जाधव (वय ३६, रा. कडेठाण ता. पैठण, रामप्रसाद उर्फ बाळू शिवाजी जाधव (वय ३२, रा. कडेठाण ता. पैठण), मिनाबाई मन्साराम पठाडे (वय ४०, रा. करंजगांव), संतोष सारंगधर पवार (वय ४०, रा. पवारगल्ली, बदनापुर), कारभारी उर्फ बापू एकनाथ घोलप (वय ३७, रा. देवगावताड ता. भोकरदन) अरुण शिवाजी नागरे (वय ३५) आणि प्रभाकर उर्फ शाम भिवसन तांबे (वय २५) दोघे रा.अकोला निकळक ता. बदनापुर अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मारेक-यांची नावे आहेत.
गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास पाचोड भागातील देवगाव येथे अशोक जाधव यांचे हातपाय बांधलेले प्रेत आढळून आले होते. या प्रकरणाचा करताना स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली. मयत अशोक जाधव यांची पत्नी रंजना हिने तिचा चुलत दिर रामप्रसाद जाधव सोबत असलेल्या अनैतिक संबधास अडसर ठरत असल्याने अशोक यांची तिची बहिण मिनाबाई पठाडेला पतीचा खुन करण्यासाठी तिच्या ओळखीच्या लोकांना दोन लाख रुपये सुपारी देण्याचे कबुल करुन खुन करण्यास सांगितले होते.
पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, सहायक पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरिक्षक संदीप सोळंके, गणेश राऊत, जमादार श्रीमंत भालेराव, धिरज जाधव, प्रमोद खांडेभराड, किरण गोरे, नामदेव सिरसाठ, पोना नरेंद्र खंदारे, संजय भोसले, बाबासाहेब नवले, योगेश तरमाळे, संजय तांदळे, जिवन घोलप, संतोष डमाळे, मनिषा चौधरी, रजनी सोनवणे यांनी केली. पोलिसांनी कार क्रमांक (एमएच-२१- व्हिएफ-८५४९), मोबाईल असा ६ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्येमाल जप्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारलं; मुख्यमंत्री म्हणाले…
- भाषणबाजी नको, म्युकरमायकोसिस विरोधात काय होमवर्क केला ते सांगा ; कॉंग्रेसचा सवाल
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
- भारतात कोरोनाचा हाहाकार ; ‘या’ राज्याने वाढवला ७ जूनपर्यंत लॉकडाऊन
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’


