Share

पोलीस बंदोबस्तात पार पडली ‘पोलीसां’ची परीक्षा!

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या २४  चालक पोलीस शिपाई पदासाठी पोलीस भरती करीता बुधवारी (दि.८) शहरातील दहा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात ही परीक्षा घेण्यात आली. यावेळी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांसह कोरोना नियमांचेही पालन करण्यात आले.

पोलीस दलाच्या आस्थापनेवर चालक, पोलीस, शिपाई पदासाठी २४ पदे रिक्त आहेत. या पदांसाठी बुधवारी सकाळी १० ते ११ :३० या वेळेत लेखी परीक्षा घेण्यात आली. यावेळी शहरातील सरस्वती भुवन, मराठा हायस्कूल, एमआयटी, जयभवानी हायस्कूल सह आदी केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.

या परिक्षेसाठी एकूण ३ हजार ३६० उमेदवारांनी नोंदणी केली होती. सदरील परीक्षेसाठी आलेल्या परीक्षार्थींची पोलिसांनी कडक तपासणी केली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षार्थींना मास्क लावूनच केंद्रात सोडण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसिंगचा अवलंब करण्यात आला होता. मास्क आणि सॅनिटाइजरचा वापर करण्यात आला. सुरक्षित अंतर ठेवून परीक्षा सुरळीत घेण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!