Share

माझ्यासोबत लग्न कर म्हणत भररस्त्यात विवाहितेची छेड काढणाऱ्यास पोलिस कोठडी

Published On: 

औरंंगाबाद : फिरण्यासाठी गेलेल्या विवाहीतेची छेड काढुन माझ्यासोबत लग्न कर अन्यथा जबरदस्तीने घेवून जाईन असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना ४ जुलै रोजी रेल्वेस्टेशन रोडवरील वॉकींग प्लाझा येथे घडली होती. याप्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी अजय घनश्याम बरंडवाल (वय ३२, रा. पद्मपुरा) याला अटक केली असून त्याला रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी शनिवारी (दि.१०) दिले.

तक्रारदार ३२ वर्षीय विवाहीतेनेदिलेल्या तक्रारीनुसार, पीडितेचे २०१७ मध्ये लग्न झाले. मात्र पीडिता व तिच्या पतीमध्ये सतत वाद होत असल्याने ती अडीच वर्षांपासून आपल्या मुलीसोबत माहेरी राहत आहे. ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्यासुमारास पीडिता वॉकींग प्लाझा येथे फिरण्यासाठी गेली होती.

त्यावेळी अजय बरंडवाल हा तेथे आला व त्याने पीडितेचा हात पकडून माझ्या सोबत लग्न कर अन्यथा तुला जबरदस्ती घेवून जाईन असे म्हणाला. तसेच पीडितेसोबत लगट करून तुझ्यावर बळजबरी करायला वेळ लागणार नाही असे म्हणाला. त्यावेळी पीडितेने स्वत: चा हात सोडवून घेत तेथुन निघत असतांना बरंडवाल याने तीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!