औरंंगाबाद : काही कारण नसतांना मित्राला शिवीगाळ करुन त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी ओम उर्फ विक्की सुनिल नगरकर (वय १९) आणि गणेश रामभाऊ बोर्डे (वय २१, दोघे रा. अरिहंतनगर) यांना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेत असलेल्या दोघांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.एच.जोशी यांनी बुधवारी (दि.१९) दिले आहेत.
विजय सुभाष बिरारे (वय २४, रा. विष्णुनगर) व ओम उर्फ विक्की नगरकर, गणेश बोर्डे हे तिघेही मित्र आहेत. १७ मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ओम उर्फ विक्की नगरकर व गणेश बोर्डे हे दोघे कोहिनुर फोटो स्टुडीओजवळ बसले होते. त्यावेळी विजय बिरारे हा तेथे गेला असता दोघांनी त्यास शिवीगाळ करून लाथा-बुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.
यावेळी गणेश बोर्डे याने त्याच्याजवळील चाकू काढुन विजय बिरारे याच्या छातीवर, पोटावर, बरगडीत आणि पायावर वार करण्यास सुरूवात केली. या घटनेत विजय बिरारे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे. विजय बिरारे याने दिलेल्या तक्रारीवरून ओम उर्फ विक्की नगरकर, गणेश बोर्डे यांच्याविरूध्द जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ओम उर्फ विक्की नगरकर, गणेश बोर्डे या दोघांना अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराज, मोदींना आग्रा दरबारातील शिवशक्तीचा प्रत्यय पुन्हा दाखवण्याची वेळ आलीये!’
- ‘मोदी कशाचीही जबाबदारी घेत नाहीत’, भाजप खासदाराचा घरचा आहेर
- मोठी बातमी! केंद्राकडून ‘म्युकरमायकोसिस’चा साथरोग कायद्यात समावेश, नवीन नियम लागू
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा म्हणजे लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंची टीका
- ‘आम्हाला बोलू दिले नाही तर मग बोलवलं कशाला?’, ममता पंतप्रधान मोदींवर भडकल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

