Share

क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा हर्सूल टी पॉईंट येथे बसवण्याची मागणी!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा २१ फुटी उंच पुतळा आता बसवण्यात आला असून या ठिकाणी जो छत्रपती शिवाजी महाराज(Chattrapati Shivaji Maharaj) यांचा जुना पुतळा होता तो हर्सूल टी पॉईंट येथे बसविण्यात यावा. अशी मागणी औरंगाबाद जिल्हा शिवजयंती समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार(Pruthviraj Pawar) व महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख(Abhijit Deshmukh) यांनी पत्राद्वारे महानगरपालिकेकडे केली आहे.

राज्य सरकारचा महत्वकांक्षी असलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे काम सुरु असून शहरातून हर्सूल जवळ असलेल्या सावंगी येथे इंटरचेंज बनविण्याचे काम सुरु आहे. या मार्गावरून अजिंठा लेणीकडे पर्यटकांना जाता येणार असल्याने शहरात येणाऱ्या पर्यटक तसेच शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांती चौक येथील जुना पुतळा हर्सूल टी पॉईंट येथे बसविण्यात यावा ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा प्रत्येकाला मिळेल.

ऐतिहासिक औरंगाबाद शहराला जोडणारा हा महत्वाचा मार्ग असून हर्सूल टी पॉईंट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी उंच चबुतरा व सभोवताली सुशोभिकरण करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जुना पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष अभिजित देशमुख यांनी केली आहे. येत्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून महानगरपालिकेने याची घोषणा करावी अशी मागणी औरंगाबाद जिल्हा शिवजयंती समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार व महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!