Share

काय आहे स्मार्ट किऑस्क? औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते झाले होते उद्धाटन..!

Published On: 

औरंगाबाद: नागरिकांना जलद, पारदर्शी व कार्यक्षम सेवा पुरवण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटीने ई गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत स्मार्ट किऑस्क बसवले आहेत. स्मार्ट किऑस्क चा उद्घाटन बुधवारी महाराष्ट्राचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टचार मंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्या हस्ते झाल्यानंतर आता झोन २, ७ आणि ९ च्या नागरि सुविधा केंद्रांवर हे किऑस्क कार्यान्वित झाले आहेत आणि नागरिक ह्याचे लाभ घेत आहेत.

औरंगाबाद स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय ह्यांचा मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटीने महत्वाकांक्षी ई गव्हर्नन्स प्रकल्प हाती घेतला आहे. मागच्या वर्षी निविदा प्रक्रियेनंतर हा प्रकल्प राबविण्यासाठी मार्स टेलिकॉम ह्या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. ई गव्हर्नन्स द्वारे मनपाचे पूर्ण कामकाज डिजिटल होणार आहे. यात मनपाचे सर्व विभागांचे कामकाज आता कॉम्प्युटर वर आणले जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता, गती आणि पारदर्शकता वाढेल. तसेच मनपा द्वारे नागरिकांना पुरवल्या जाणारे विविध सेवा ही आता ऑनलाइन उपलब्ध होतील.

औरंगाबाद स्मार्ट सिटी चे प्रकल्प अभियंता फैज अली म्हणाले की मालमत्ता कर व पाणी पट्टी भरणे, तक्रार नोंदणी, जन्म, मृत्यू व लग्नाचे प्रमाणपत्र प्राप्त करणे, वेगवेल्या परवाने काढण्यासाठी आता नागरिकांना ई गव्हर्नन्स प्रकल्पामुळे घरी बसल्या मोबाईल वर करता येणार आहे. ह्या साठी आता नवीन फिचर्स सोबत औरंगाबाद महपालिकेची वेबसाईट आहे. http://aurangabadmahapalika.org/ ह्या संकेस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांना सेवेचा अधिकार अंतर्गत सर्व सुविधा वेळ ना घालवता, कार्यालयाचे चक्कर ना लावता सोप्या पद्धतीने ह्या सेवेचा लाभ घेता आला पाहिजे. यासाठी मनपाची नवीन फिचर्स युक्त वेबसाईट लाईव्ह आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!