नाशिक : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर भाजप नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. असे असतांनाच आता राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी वाईन विक्रीचे समर्थन केले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना भुजबळ म्हणाले की,‘अख्ख्या जगाने वाईनला हेल्थ फूड म्हणून मंजुरी दिली असून त्यामध्ये शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल. ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणारच आहे. त्यामुळे उगीच साप साप म्हणून भुई थोपटण्याचे काम सध्या सुरु आहे. काहीतरी विषय काढून त्याच्यावर आंदोलन करायचं हे काही बरोबर नाही’, असे भुजबळ म्हणाले.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वाईन व्यवसायात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांची एका बड्या उद्योजकाशी पार्टनरशीप आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यावर उत्तर देत राऊत म्हणाले की,‘आमची एखादी वायनरी असेल तर सोमय्यांनी ती ताब्यात घ्यावी आणि चालवावी. तशी काही वायनरी असेल तर मी त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे. तसेच कुणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. सोमय्यांचा मुलगा काय चणे- शेंगदाणे विकतो का? भाजप नेत्यांची मुलं काय रस्त्यावर केळी विकतात का? अमित शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?’,असा संतप्त सवालही राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्या जमाती कुठे सापडतील?’; रूपाली पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
“नथुरामला नायक दाखवून महात्मा गांधींना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न कदापी खपवून घेणार नाही”
शिक्षणासाठीची यांची ही तळमळ संवेदनाहीन सरकारच्या संवेदना जागवेल का?- चित्रा वाघ
‘…आशांवर कारवाई करायला पाहिजे’; वर्षा गायकवाड यांची भाजपवर टीका
“देश हिंदुत्व विचाराने नाही तर गांधी विचाराने चालेल”, नाना पटोलेंचे प्रतिपादन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

