Share

लसीकरणाचा वेग कमी असलेल्या ४० जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदी उद्या साधणार संवाद

Published On: 

नवी-दिल्ली : झारखंड, मणीपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय अशा राज्यातील एकूण ४० जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग कमी झाल्यामुळे जी-२० परिषद आणि सीओपी-२६ हवामान परिषद या दौऱ्यावरुन परत आल्यावर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत.

आत्तापर्यंत देशात १०६ कोटींपेक्षा अधिक नागरीकांना लस देण्यात आली आहे. परंतु असे असले तरी मागील काही दिवसांपासून लसीकरणाचा वेग कमी झाला असून अनेकांनी लसीचा दुसऱ्या डोस घेण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अनेक राज्यात शाळा, महाविद्यालये सुरु करण्यात आल्या असून चित्रपटगृह देखील पुर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली आहेत.

दरम्यान, सध्या देशात सर्व व्यवस्था पूर्णपणे खुल्या करण्यात आल्या आहे. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वेगाने लसीकरण करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!