Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी हा दारुडा माणूस – प्रकाश आंबेडकर

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : राज्यात परतीच्या पावसाने घातलेल्या धूमशानामुळे शेतीसह इतर मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं आहे. यानंतर अनेक नेते नुकसानग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील सोलापूरचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार प्रहार करताना त्यांची जीभ घसरली.

‘केंद्र सरकार हे राज्य सरकारहुन वाईट आहे. हिंदीमध्ये कवाडी म्हणतात तसे पंतप्रधान आहेत. दारुड्या जसं पैसे मिळाले नाही कि पत्नीला मारतो आणि मग त्याच्या लक्षात आलं कि बायकोकडे काही शिल्लक राहिलेलं नाही. मग तो घरातलं सगळं सामान विकतो. अन तेही संपलं की तो मग घरच विकतो. मोदी या देशातला पंतप्रधान नसून हा दारुडा आहे आणि म्हणून इथलं आख्ख विकायला निघाला आहे’ असा एकेरी उल्लेख करत त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागात जाणे म्हणजे एक प्रकारचा दिलासा असतो. मुख्यमंत्र्यांनी एकाच जिल्ह्यात जाऊ नये, अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे, लवकरात लवकर सरकारने मदत केली पाहिजे. मात्र, तीन पायांच्या या सरकारमधील एक पाय मदत जाहीर करू नये म्हणून दुसऱ्यावर दबाव टाकत असल्याचा मला वास येत असल्याची टीका देखील आंबेडकरांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!