🕒 1 min read
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सव पार पडत आहे. राज्यभरात यंदा कोरोनाच्या सावटामुळे सण, उत्सवांवर बंधन असल्यानं काहीसा उत्साह कमी असला तरी भाविक शक्य तसे मनोभावे हे उत्सव साजरे करत आहेत. या काळात आदिशक्तींची पूजा देशभरात केली जाते.
महाराष्ट्रात तुळजापूर, कोल्हापूर, वणी आणि माहूर या साडेतीनशक्तिपीठांमध्ये पारंपरिक पद्धतीने हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर राज्यातील लाखो भाविक देवीचे मनोभावे दर्शन घेत असतात. मात्र या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे मंदिरे उघडलेली नाहीत. या उत्सव काळात देवींचे सर्व धार्मिक विधी पार पडणार असल्याचे देवस्थान समितींमार्फत असून भाविकांना देवींचे दरवर्षीप्रमाणे दर्शन घेता येणार नाही. मंदिर व्यवस्थापनांनी भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची सोय करून दिली आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करवीरनिवासिनी अंबाबाईची विविध रूपात पूजा बांधली जाते. या रूपांना पौराणिक महत्व देखील असते. तर देवीची मंदिर परिसरात निघणारी पालखी हे खास वैशिष्ट्य असतं. यंदा भक्तांना मंदिरात जात येत नसलं तरी हे सर्व धार्मिक विधी इतर ऑनलाईन माध्यमातून पाहता येणार आहेत. आज नवरात्रोत्सवाचा चौथा दिवस. चतुर्थीला अंबाबाई आपल्या व्यापक रूपात विराजमान झाली आहे. आज श्रीकरवीरमाहात्म्यातील सनत्कुमार योगिजनांना महालक्ष्मीची हजार नावे सांगतात त्या अध्यायाला अनुसरून पूजा बांधण्यात आली आहे.
पहा फोटो –



महत्वाच्या बातम्या
- ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाचा अभ्यास करु नका, नापास होताल; प्रकाश शेंडगेंचा संभाजीराजेंना टोला
- आरोग्य विषयक पायाभूत सुविधा निर्मितीसाठी 10,000कोटी रुपयांची केंद्राने योजना केली जाहीर
- ते राहुल गांधींचं मत, मी माफी का मागू ? ; गांधींच्या नाराजीवर कमलनाथांचं प्रत्युत्तर
- नगर जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने; रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ९४.४५ टक्के!
- विखेंच्या आत्मचरित्रात बबनराव पाचपुतेंवर टीका: १९९१ च्या लोकसभेला बबनरावांनी धोका दिला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
