Share

श्री तुळजाभवानी देवीची आज रथ अलंकाराने महापूजा

Published On: 

तुळजापूर –तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात आज मंगळवारी चौथ्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची ललित पंचमी निमित्त  देवीची नित्योपचार पूजेनंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली.

ललीता पंचमी निमित्त आज रथ अलंकार पूजा मांडण्यात येते. भगवान सुर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री भवानी मातेस दिला. याप्रमाणे रथ अलंकार अवतार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.

दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. यात, उद्या दि. 21 रोजी मुरली अलंकार महापूजा, दि. 22 रोजी शेषशाही अलंकार महापूजा,दि. 23 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 24 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत. तत्पूर्वी, काल (सोमवार) रात्री 10 वाजता श्री देवीच्या  छबिना मिरवणूक काढण्यात आली.

तत्पूर्वी रात्री तिसऱ्या माळेच्या दिवशी मंदिर संस्थानचे तहसीलदार श्री सौदागर तांदळे व मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले यांच्या उपस्थितीत अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात नंदी वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली. प्रक्शाळ पूजा झाली.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!