नवी दिल्ली: लोकसभेत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सध्या चर्चा सत्र सुरू आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सभागृहाला आणि देशाला उद्देशून भाषण करत आहेत. यावेळी बोलताना देशात कोरोना विषाणू पासरवण्यासाठी कॉंग्रेस जबाबदार असल्याचा आरोप देखील मोदींनी लावला आहे. यावर राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी आक्षेप नोंदवला आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉंग्रेसवर (Congress) चांगलाच हल्ला चढवला होता. तसेच गोव्याला स्वातंत्र्य उशिरा मिळाले यासाठी देखील मोदींनी यावेळी नेहरूंवर निशाणा साधला होता. पंडित नेहरूंना गोव्याच्या स्वातंत्र्यापेक्षा त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेची जास्त चिंता होती म्हणून गोव्याला १५ वर्षे उशीरा स्वातंत्र्य मिळाल्याचा आरोप त्यांनी केला.
नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सल्ला सुद्धा दिला आहे. मोदी म्हणाले, संघराज्य पद्धतीबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वाचण्याचा सल्ला विरोधकांना दिला. पंतप्रधान मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणातील एक संदर्भ वाचून दाखवला. फेडरेशन एक युनियन आहे. प्रशासनाच्या सुविधेसाठी वेगवेगळ्या राज्यांची निर्मिती होऊ शकते. मात्र, देश अभिन्न आहे असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
वेस्टइंडीज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याकरता या चार खेळाडूंचे पुनरागमन
‘मोदींच्या भाषणावर सुप्रिया सुळेंनी हैराण होऊ नये’; नवनीत राणा यांचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

