Share

कोरोनात विधवा झालेल्या महिलांसाठी योजना; ग्रामविकास विभागाचा निर्णय जारी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी अशा महिलांसाठी ‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या (उमेद) माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब महिलांना उपजीविकेच्या शाश्वत संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने या प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी ही योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या शासन निर्णयान्वये गावनिहाय माहिती प्राप्त करून एकल, विधवा महिलांना स्वयंसहाय्यता समूहामध्ये प्राधान्याने समाविष्ट करण्यात येणार आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार या महिलांच्या किमान पाच सदस्यांच्या स्वतंत्र स्वयंसहाय्यता समूहाला उमेदचे लाभ उपलब्ध करून देण्यात येतील.

उमेदमार्फत एकल/विधवा महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येतील. त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबातील १८ ते ३५ वयोगटातील युवक, युवतींना दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देतानाही प्राधान्य देण्यात येणार आहे. आरसेटी योजनेअंतर्गत १८ते ४५ या वयोगटातील युवक-युवतींना १० ते ४५ दिवसांचे कृषि विषयक प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग विषयक प्रशिक्षण, उत्पादक विषयक प्रशिक्षण असे विविध व्यवसायांचे मोफत व निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!