Share

गेल्या तीन वर्षांपासून छावणी चालकांवर दुष्काळ; वीस टक्के बिलाची रक्कम अद्याप प्रतीक्षेत

Published On: 

बीड: जिल्ह्यात २०१९ पासून ज्या छावण्या दुष्काळात चालवल्या आशा संस्थांना २० टक्के बिलची रक्कम अजूनही मिळाली नाहीये. टी रक्कम मिळावी यासाठी छावणी चालक संघटनेच्या वतीने जिल्हा संघटक गणेश उगले व जिल्हा समन्वयक अॅड. ज्ञानेश्वर खाडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी छावणी चालक संघटनेचे वीस ते पंचवीस जणांचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप व स्थानिक स्वराज्य संस्थाचे आमदार सुरेश धस यांना भेट दिली.

बीड जिल्ह्यातील सर्व छावण्यांचे २० टक्के बिलाची रक्कम तात्काळ मिळावी. जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरू असलेले छावणी दंडाच्या अपील लवकर निकाली काढण्यात यावेत. यासह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जगताप व आमदार सुरेश धस यांना दिले. यावेळी शिवसेना नेते तथा छावणी चालक संघटनेचे जिल्हा संघटक गणेश उगले व अॅड. ज्ञानेश्वर खाडे यांनी सावनी चालकांची सविस्तर बाजू मांडली.

यावेळी आमदार धस यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांनी छावण्या चालवलेल्या आहेत. त्यामुळे इमानदारीने छावण्या चालविणाऱ्या सर्व छावणी चालक संस्थांचे दंड माफ करून राहिलेली २० टक्के बिलाची रक्कम त्वरित द्यावी अशी मागणी करण्यात आली. आमदार सुरेश धस यांनी सुद्धा छावणी चालक शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून छावणीच्या सर्व मागण्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर सर्व पैसे मिळवून देऊ, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. तसेच जिल्हाधिकारी जगताप यांनी छावण्यांचे देयके विभागीय आयुक्त पत्र दिले जाईल, असे सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!