इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाने शुक्रवारीपासून साऊथॅम्प्टनमध्ये सराव सुरु केला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे होईल. आयसीसीच्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला अवघे 3 दिवसचं बाकी आहेत. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही संघ इंग्लंडमध्ये असुन पुर्णपणे सज्ज झाले आहेत.
या सामन्याआधी इंग्लंड आणि न्युझीलंड संघादरम्यान ऍजबॅस्टन येथे दुसरा कसोटी सामना झाला. या सामन्यात पाहुण्या न्युझीलंडने यजमान इंग्लंड संघाचा 8 गडी राखुन पराभव केला आहे. या विजयासह न्युझीलंडने दोन कसोटी सामन्याची मालिका 1-0 अशी जिंकली आहे.
आता आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्या फायनल सामन्यासाठी भारताविरुद्ध 15 सदस्यीय संघाची पुष्टी केली आहे. इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांच्या मालिकेत खेळलेल्या डग ब्रेसवेल, जेकब डफी, डॅरेल मिचेल, रचिन रवींद्र आणि मिचेल सॅंटनर यांच्यासह पाच खेळाडूंना मूळ 20 सदस्यीय संघातून वगळण्यात आले आहेत.
The @ICC World Test Championship starts on Friday, are you ready to #BACKTHEBLACKCAPS ????#WTC21 #CricketNation #Cricket https://t.co/cbeUie0laf
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 15, 2021
न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कॅप्टन), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेव्हन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहॉम, मॅट हेन्री, काईल जेमीसन, टॉम लाथम, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, टिम साउदी, रॉस टेलर, नील वॅग्नर, बीजे वॅटलिंग आणि विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या
- WTC चा अंतिम सामना जिंकणाऱ्या टीमला मिळणार ‘एवढी’ रक्कम
- ‘या’ ठिकाणी दुसऱ्यांदा अतिक्रमणाचा प्रयत्न, मनपाच्या अतिक्रमण विभागाने हाणून पाडला!
- इशांत का सिराज, ‘विराट’प्रश्न ; सराव सामन्यात मिळालं उत्तर
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा
- ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करा, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे निर्देश!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

