Share

शहरासाठी २१८ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी उपाय योजना करा, खंडपीठाचे निर्देश 

Published On: 

औरंंगाबाद : शहरातील विविध कोव्हिड रूग्णालयात रूग्णांसाठी अत्यावश्यक असणारा २१८ मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा नियमितरित्या उपलब्ध करून देण्यासाठी येत्या ४८ तासात उपाय-योजना कराव्यात असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या.बी.यू.देबडवार यांनी अन्न व औषध विभागाला नुकतेच दिले आहेत.

शहरातील रुग्णालयांतून ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात गुरुवारी झालेल्या सुनावणीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वतः हजर राहून सविस्तर माहिती दिली. औरंगाबादेत मराठवाडा तसेच लगतच्या राज्यांतूनही रुग्ण येत आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची गरज वाढली आहे. म्हणून विविध ठिकाणांहून तो उपलब्ध करणे तसेच स्थानिक पातळीवर निर्मिती करण्यासाठी काम होत आहे. राज्य शासनाकडेही मागणी नोंदविण्यात आल्याची माहिती केंद्रेकर यांनी दिली.

त्यावर खंडपीठाने समाधान व्यक्त केले. कोरोना रुग्णांना रुग्णवाहिका ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना शहरातील रुग्णालयांपर्यंत आणण्यासाठी शासकीय वाहनांच्या उपलब्धतेविषयीची माहिती सादर करण्यात आली. राज्य शासनातर्फे लवकरच आणखीन सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले. यावर खंडपीठाने समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील रुग्णांची कोणत्याही प्रकारे हेळसांड होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!