जालना : नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि.२१) साडेबाराच्या सुमारास गळती लागली. या दुर्घटनेमुळे ऑक्सिजन अभावी २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण गंभीर असून तब्बल २ तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती विदारक असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर मंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे मागणी केली आहे. यात त्यांनी जालना जिल्ह्यात ऑक्सिजन गळती किंवा ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ नये यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना करा अशी मागणी केली आहे.
तसेच त्यांनी म्हटले आहे की, जालना जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची अघटित घटना घडू नये यासाठी आपण तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे. अशी घटना घडलीच तर ती घटना तात्काळ नियंत्राणात आणण्यासाठी व तात्काळ ऑक्सिजनची होणारी गळती बंद करण्यासाठी आवश्यक असणारी तांत्रिक यंत्रणा व मनुष्यबळ आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. या काळात हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या दृष्टीकोनातून मुबलक प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. नाशिक येथे झालेल्या दुर्घटनेत इतर रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकर मागावावा लागला होता. ती वेळ आपल्या जिल्ह्यावर येऊ नये याची देखील खबरदारी घेणे आवश्यक आहे.
मात्र दुर्देवाने अशी घटना घडल्यास एकाच वेळी अनेक रुग्ण अत्यवस्थ होऊ शकतात. अशा परिस्तिथतीत अतिरिक्त वैद्दकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. ती खबरदारी देखील आपण घ्यावी. त्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी करुन ठेवणे अपेक्षित आहे. कठीण काळात खबरदारीचा उपाय म्हणून ऑक्सिजनची जलद वाहतूक व पुरवठा करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणेसह त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे देखील अत्यंत महत्तवाचे आहे. नाशिकची घटना पुन्हा घडु नये यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची जालना जिल्हाधिकाऱ्यांना पत्रात मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ही वेळ राजकीय चिखलफेक करण्याची नाही; धीरज देशमुखांनी सादर केली ‘ती’ आकडेवारी
- ‘कोरोनाची दुसरी लाट मोदी निर्मित प्रकोप’, ममता बॅनर्जी यांचा घणाघात
- अल्पवयीन मुलीलापळवून नेत तिच्यावर अत्याचार करणारा अटकेत
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोरगाव अर्ज येथे अन्नदानाऐवजी रक्तदानाला प्राधान्य!
- कोरोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीला भाजप जबाबदार-पी.चिदंबरम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

