Share

अल्पवयीन मुलीलापळवून नेत तिच्यावर अत्याचार करणारा अटकेत

Published On: 

औरंगाबाद : अल्पवयीन मुलीलापळवून नेत तिच्यावर अत्यचार करणाऱ्या तरुणाला सातारा पोलिसांनी गुरुवारी दि.२२ पहाटे अटक केली. अशांत किशोर वाघमारे (२१ , रा. औरंगाबाद)असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला शनिवारपर्यंत दि.२४ पोलीस कोठडीत ठेवण्याचेआदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एस. निंबाळकर यांनी दिले.

या प्रकरणात १५ वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली. त्यानूसार, १९ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता पीडिता ही दुकानात आईस्क्रिम आणण्यासाठी गेलीहोती. मात्र ती घरी परतीलच नाही, त्यामुळे घरच्यांनी तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. प्रकरणात सातारापोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाच्याअनुषंगाने फिर्यादीकडे चौकशी केली असता, परिसरात राहणारा आरोपीअशांत वाघमारे याच्यावर संशय व्यक्त केला.दरम्यान २१ एप्रिल रोजी पीडिता आणि आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाले. तेंव्हा पोलिसांनीपीडितेचा जबाब नोंदवला. त्यानूसार,आरोपी व पीडिता हे एकाचगल्लीत राहणारे असून त्यांच्यात सुमारे एक—दीड वर्षांपासून प्रेम संबंधआहेत.

ते नेहमी भेटत व बोलत होते. १९ एप्रिल रोजी पीडिता ही दुकानात आईस्क्रिम आणते म्हणून घरातूननिघाली होती. मात्र ती आरोपीला भेटण्यासाठी गेली. बराचवेळ गप्पा मारल्यानंतर घरीजाण्यास उशीर झाल्याने पीडितेने घरचे रागावतिल, बाहेर हाकलून देतील याभितीने आरोपीला कुठेतरी घेवून चल असे सांगितले. त्यानंतर आरोपीने दुचाकीवर (क्रं.एमएच—२०—ईआर—५७१९)पीडितेला अहमदनगर येथेनेले. तेथे रस्त्यावरील एका शेतात ते दोन दिवस थांबले. तेथेच आरोपी व पीडितेमध्येदोनवेळा शरीरिक संबंध आले.

२१ एप्रिल रोजी आरोपीच्या घरच्यांनी व मित्रांनीफोन करुन पीडितेच्या आई वडीलांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. त्यानंतरआरोपी पीडितेसह पोलीस ठाण्यात हजर झाला.आरोपीला आजन्यायालयात हजर करण्यात आले असता,सहायक लोकाभियोक्ताउल्हास पवार यांनी आरोपीची वैद्यकिय तपासणी करणे आहे. गुन्हा करतेवेळी आरोपीनेपरिधान केलेले कपडे आणि दुचाकी जप्त करणे आहे. तसेच आरोपीला गुन्ह्यात कोणीसहकार्य केले याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंतीन्यायालयाकडे केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!