Share

IPL: अंतिम सामन्यात धडाकेबाज प्रवेश करणाऱ्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! ; स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त?

Published On: 

युएई : आयपीएलचे विजेतेपद मिळविण्यासाठी आता चार संघांचं स्थान निश्चित झालं असून ते जोर लावताना दिसत आहेत. कालच्या दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सच्या सामान्यमध्ये मुंबईने दणदणीत विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तर, दिल्लीच्या संघाला अजून एक संधी आहे.

काल, दिल्लीने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली. मात्र, मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २०० धावांचा डोंगर रचून दिल्ली समोर कडवं आव्हान उभं केलं. यानंतर, दिल्लीच्या फलंदाजांची मुंबईच्या गोलंदाजांनी दाणादाण उडवली आणि तब्बल 57 धावांनि विजय मिळवत मुंबईने अंतिम सामन्यात धडक मारली.

कालच्या सामन्यात बुमराह आणि ट्रेंट बोल्टने सुरुवातलीच दिल्लीच्या फलंदाजांना बाद करून शून्य धावांवर तीन बाद अशी दयनीय अवस्था केली होती. यानंतर देखील त्यांनी विकेट्स घेतल्या आणि मुंबईला विजय मिळवून दिला. मात्र मुंबईला अंतिम सामन्याआधी मोठा झटका लागला आहे. मुंबईचा स्टार गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट दुखापतग्रस्त झाला आहे.

बोल्टला ग्रोईन इंज्युरीचा त्रास झाला आहे. बोल्टच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली आहे. बोल्टने सामन्याच्या दुसऱ्या डावातील पहिल्याच षटकात दिल्लीच्या टॉपच्या बॅट्समनना शून्यावर बाद केलं. बोल्टने पृथ्वी शॉला विकेटकीपर क्विंटन डी कॉकच्या हाती पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद केलं. यानंतर पाचव्या चेंडूवर अजिंक्य रहाणेला पायचीत केलं. यासह त्याने पहिली ओव्हर डबल विकेट मेडन टाकली. यानंतर त्याने आणखी एक ओव्हर टाकली. मात्र सामन्याच्या 14 व्या ओव्हरमध्ये त्याला त्रास जाणवू लागला. यामुळे बोल्टला मैदानाबाहेर जावे लागले.

दुखापतीमुळे बोल्टला आपल्या कोट्यातील सर्व ओव्हर टाकता आल्या नाहीत. त्यामुळे अंतिम सामना जवळ आला असताना यंदाच्या मोसमात उत्कृष्ट कामगिरी करून मुंबईसाठी महत्वाची कामगिरी करणाऱ्या बोल्टला झालेली दुखापत मुंबई इंडियन्ससाठी डोकेदुखी ठार शकते. बोल्टची दुखापत कितपत गंभीर आहे याबाबत मात्र अजून संघ व्यवस्थापनाकडून अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!