Share

‘नितीशकुमार यांनी शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले तेव्हाच त्यांनी पराभवाची कबुली दिली’

Published On: 

पटना : ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे माझ्या पक्षाला विजयी करा. ज्याचा शेवट गोड, ते सगळंच गोड, असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज म्हणाले. ‘आज निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे. परवा मतदान आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे,’ असं कुमार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हटलं. आमच्या उमेदवाराला विजयी कराल ना, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थितांना विचारला.

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. पूर्णियामध्ये एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही मोठी घोषणा केली.एका रथाने नितीश कुमारांनी निवृत्तीचीच घोषणा केली आहे.

नितीश कुमार यांनी सत्ता कायम राखण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर मित्रपक्ष भाजपनंही पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांच्या सभांचं आयोजन करून बिहार पिंजून काढला आहे. संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पक्षासमोर राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसनं आव्हान उभं केलं आहे.

नितीश कुमार यांच्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक प्रचंड आव्हानात्मक आहे. एका बाजूला चिराग पासवान सातत्यानं नितीश कुमार यांना लक्ष्य करत आहेत. केंद्रात एनडीएचा घटकपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षानं बिहारमध्ये एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकजनशक्ती पक्ष अगदी उघडपणे कुमार यांच्याविरोधात उतरला आहे. त्यांनी संयुक्त जनता पक्षाच्या उमेदवारांविरोधात सगळ्याच जागांवर उमेदवार दिले आहेत. मात्र भाजपच्या जागांवर उमेदवार दिलेले नाहीत. त्यामुळे जनता दलाच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, कॉंग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी नितीश यांच्यावर टिका केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पराभव स्वीकारल्याचे चिदंबरम म्हणाले.पी. चिदंबरम म्हणाले, नितीशकुमार यांनी जेव्हा त्यांची ही शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले तेव्हा त्यांनी पराभवाची कबुली दिली. ‘शेवटची निवडणूक’ ही त्यांचे पाठिंबा देण्याचे आवाहन नाही. तर त्यांच्या अपयशाची दया याचिका आहे. ते जर निवडून आले तर पहिल्या दिवसापासून सुस्त होतील. अशा व्यक्तीला बिहारच्या लोकांनी मतदान का करावे?, असा प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थीत केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!