मुंबई : देशात कोरोनाने हाहाकार माजवल्यानंतर टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. यावेळी मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे व सार्वजनिक स्थळे बंद करण्यात आले होते. तर, जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अन्य काही धार्मिकस्थळे मंदिरे देखील खुली करण्यात आली असताना महाराष्ट्रात मात्र प्रार्थनास्थळे अजूनही बंद ठेवण्यात आले आहेत.
त्यामुळेच, बार-रेस्टोरंट्स व इतर गोष्टी देखील सुरु करण्यात आले असताना फक्त धार्मिक स्थळेच बंद का? असा आक्रोश विरोधकांकडून केला जात आहे. वंचित बहुजन आघाडी, भाजपसह अन्य धार्मिक संघटना देखील राज्य सरकार विरोधात आक्रमक झाल्या आहेत. आता, कोरोना काळात सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारा पक्ष म्हणून ओळख निर्माण केलेल्या मनसेने देखील मंदिर खुली करण्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
गेल्या काही महिन्यात मुंबईचे डबेवाले, सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा, महाविद्यालयांची फी-वाढ यांसह अनेक प्रश्नांसाठी नागरिकांनी थेट कृष्णकुंज गाठलं होतं. आता, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ‘पुनःश्च हरी ॐ म्हणता व “हरी” ला च कोंडून ठेवता. बार उघडले, मग बार ची वेळ देखील वाढवून दिली. आता जलतरण तलाव , मल्टिप्लेक्स ला परवानगी, मग कोरोना फक्त मंदिरातच होईल का? काय तर्क (Logic) असावा या मागे हे कोडेच आहे. हा केवळ भावनेचा नाही तर तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे.’ असा घणाघात करत त्यांनी मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे.
तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे.@CMOMaharashtra ,@mnsadhikrut ,@abpmajhatv ,@News18lokmat ,@zee24taasnews ,@TV9Marathi
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) November 6, 2020
महत्वाच्या बातम्या
- खडसेंपाठोपाठ ‘हा’ बाहुबली नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश
- दिल्लीसोबतच्या विजयानंतर रोहित शर्माने केलेल्या ‘त्या’ घटनेचं क्रिकेटरसिकांनी केलं भरभरून कौतुक !
- स्वतःला साधूसंत म्हणवून घेता पण तुम्हाला हरिपाठ तरी पाठ आहे का ते सांगा?
- खोट्या खेलो इंडिया जाहिरातीद्वारे अनेक खेळाडूंना फसवल्याप्रकरणी एफआयआर दाखल
- आदित्यजी ! …तर पुढील सात पिढ्या आपल्याला आशीर्वाद देत राहतील – सत्यजित तांबे

