Share

अकोले तालुक्यातील रुग्णाचा प्रवास झोळीतून आमदार लहामटे काय करतात?; सुरेश भांगरे आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अनेक गावे आजही उपेक्षित जीवन जगत आहेत. तालुक्यात रस्ता नाही, आरोग्याची साधने नाहीत. तालुक्यातील अनेक आदिवासी गावांमध्ये आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. अशा स्थितीत रुग्णांना बाजेवर बसवून किंवा कपड्याची झोळी तयार करून त्यामध्ये बसवून आरोग्य केंद्रात नेण्याची वेळ येते. गेली चार वर्षे जिल्हा परिषद सदस्य व आता आमदार असलेल्या डॉ.किरण लहामटे यांनी याबाबत काय उपाय योजना व पाठपुरावा केला, असा सवाल आदिवासी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते व उपसरपंच सुरेश भांगरे यांनी केला आहे.

सुरेश भांगरे पुढे म्हणाले की, नगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील कुमशेत, जानेवाडी, ठाकरवाडीआदी आठवाडयांना आरोग्य तपासणीसाठी १६ किलोमीटर उपकेंद्र असलेल्या आंबित व शिरपुंजे येथे जावे लागते. मोठा आजार असेल, तर ४० किलोमीटरवर असलेल्या राजूर, मवेशी रुग्णालयात जावे लागते. डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहणाऱ्या देशात व राज्यात आदिवासींचे साधे आरोग्याचे प्रश्न सुटत नसल्याचे उदाहरण पाहायला मिळत आहे. तालुक्यातील अनेक गावात कोण आजारी पडले किंवा एखादी दुर्घटना घडली की लाकडाला बांधून अथवा डोली तयार करून नेण्यात येते. हिच कसरत गेली अनेक वर्षे येथील ग्रामस्थ मूकपणे सोसत आहेत.

सातेवाडी गटात ४ वर्षे जिल्हा परिषद सदस्य व आता आमदार असलेले व आदिवासींच्या आरोग्याबाबत सतर्कता दाखविण्याचे आव आणणारे डॉ.किरण लहामटे करतात काय? आदिवासींना घनदाट जंगलातून पाय वाटेने ये-जा करावी लागते. गावात कोणी आजारी पडले किंवा एखादी दुर्घटना घडली, की लाकडाला बांधून अथवा डोली तयार करून नेण्यात येते. ही कसरत येथील ग्रामस्थ मुकपणे सोसत आहेत, अशी खंत सुरेश भांगरे यांनी व्यक्त केली आहे. आदिवासी भागात अशा पद्धतीने ग्रामस्थांना हाल सहन करावे लागत असेल, तर महाराष्ट्रात आंदोलन छेडले जाईल, असेही भांगरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!