कोल्हापूर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वी चार दशकांचा भाजपसोबत असलेला संसार मोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांना महत्वाचं मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, सद्या फक्त राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी मिळणार यावर जवळजवळ निश्चिती असतानाच खडसेंनी भाजपला जोरदार धक्के देण्यास सुरुवात केली आहे.
उत्तर महाराष्ट्रात शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला असतानाच अजूनही काही आमदार आणि २०१९ विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपवासी झालेले नेते घरवापसी करणार असं भाकीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते करत आहेत.
आता, कोल्हापुरातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे नेते आणि माजी आमदार राजीव आवळे हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. राजीव आवळेंच्या प्रवेशामुळे आता उत्तर महाराष्ट्रापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं बळ मिळू शकतं. माजी आमदार राजीव आवळे मुंबईत राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित १० तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘केंद्र सरकारने गुटखा निर्मिती व विक्रीवर बंदी आणावी’ मनसे नेते बाळा नांदगावकरांची मागणी
- दिल्लीसोबतच्या विजयानंतर रोहित शर्माने केलेल्या ‘त्या’ घटनेचं क्रिकेटरसिकांनी केलं भरभरून कौतुक !
- स्वतःला साधूसंत म्हणवून घेता पण तुम्हाला हरिपाठ तरी पाठ आहे का ते सांगा?
- खोट्या खेलो इंडिया जाहिरातीद्वारे अनेक खेळाडूंना फसवल्याप्रकरणी एफआयआर दाखल
- आदित्यजी ! …तर पुढील सात पिढ्या आपल्याला आशीर्वाद देत राहतील – सत्यजित तांबे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

