🕒 1 min read
मुंबई : भारतीय जनता पक्षामुळे देशाचे नुकसान होत आहे. त्या पक्षाला देशातून हद्दपार करायचे आहे. त्यासाठी कोणासोबतही आघाडी करण्याची वेळ आली तरी देखील आम्ही करू, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. नुकतीच अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाने शिवसेनेची मदत घेतल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भात खा. जलील यांनी प्रतिक्रिया दिली. याबाबत ‘एबीपी माझा’ने वृत्त दिले आहे.
खा.इम्तियाज जलील म्हणाले की, ‘अमरावती मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत एमआयएमची शिवसेनेसोबतची युतीची गोष्ट खरी आहे. पण स्थानिक पातळीवरील गणिते वेगळी असतात. यामध्ये वरिष्ठ स्तरावरील नेत्यांचा काही विषय नसतो. विकासकामे करत असताना कुणाची मदत घेऊ शकतो, याचा विचार स्थानिक पातळीवरील नेते करत असतात.
अमरावतीच्या या निवडणुकीत स्थानिक नेत्यांना शिवसेनेची मदत घेणे योग्य वाटले असेल, जेणेकरून विकासकामे करता येतील. हा निर्णय केवळ त्या अनुषंगाने झाला आहे. आम्हाला सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी कुणाशीही आघाडी करायची वेळ आली तर आम्ही नक्कीच ती आघाडी करण्यासाठी तयार आहोत. फक्त भाजप सत्तेत येऊ नये.’
औरंगाबाद मनपावर ते म्हणाले की, पुढील निवडणुका एमआयएम स्वतंत्र लढणार आहे. औरंगाबाद तर आमचा गड आहे. त्यामुळे तिथला तर विषय येत नाही. अमरावतीचा निर्णय केवळ स्थानिक पातळीवरील आहे. याचा अर्थ असा नाही की आमची राज्यभरात शिवसेनेसोबत युती होईल. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करू. कोणतीही आघाडी उदयास येणार असेल तर एमआयएम पक्ष याच नक्कीच स्वागत करेल अशी भुमिका जलील यांनी मांडली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काही मंत्री मराठा समाजाविरोधात षडयंत्र रचत आहेत’, मेटेंचा गंभीर आरोप
- धक्कादायक! अनुकंपा नोकरीसाठी शरीरसुखाची मागणी, समाजकल्याण अधिकाऱ्यावर गुन्हा
- बीड डीसीसी निवडणूक; मातब्बर रिंगणात उतरल्याने चुरस वाढली
- घाम पुसण्यासाठी मास्क खाली केला तरी होतोय दंड!
- आंदोलन, वाद, आरोप-प्रत्यारोपानंतर पंकजा मुंडेंचा ‘वैद्यनाथ’ पुन्हा सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
