Share

पुण्यात 18 वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लसीकरणाची परवानगी मिळणार ?

Published On: 

🕒 1 min read

पुणे : देशात काही राज्यात दररोज कोविडचे नवे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात त्यातही पुण्यात अचानक कोरोना पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, नियम न पाळणाऱ्यांवर आता पालिकेकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. काल  लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या  बैठकीत पुण्यात लॉकडाऊन होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण कडक निर्बंध घालण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश घेण्यात आले आहेत. तसेच उद्यानं एकवेळ बंद राहणार आहे. त्याशिवाय हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंतच सुरू राहणार आहे, असे निर्णय काल झालेल्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

दरम्यान, एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनामुळे दिवसेंदिवस पुण्याची स्थिती बिघडत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्यातील १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना सरसकट लस देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

सध्या एक मार्चपासून 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली. 45 वर्षांवरील सहव्याधी (कोमॉर्बिडीटीज) असलेल्या नागरिकांनाही लस दिली जात आहे.

पुणे जिल्ह्यातील भाजप खासदार गिरीश बापट, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव सादर करावा, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे.

शहरात 18 वर्षांवरील सरसकट लस देण्यासाठी खासदारांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. लसीकरणाच्या या निर्णयासाठी जिल्ह्यातील खासदारांना पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!