🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने एप्रिलअखेर शहरातील दोन लाख १६ हजार जणांना डोस देण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे, ५० पेक्षा जास्त बाधित रुग्ण असलेल्या रेड झोन वॉर्डांमध्ये लसीकरणावर भर दिला जाणार आहे. अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी दिली.
कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी केंद्र शासनाने दोन लसींना मंजुरी दिल्यानंतर १६ जानेवारीपासून देशभर लसीकरणाला सुरवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांना व त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक, आजारी असलेल्या व्यक्तींना कोरोना लस देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. पहिल्या टप्प्यात लस देताना आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांची नोंदणी करण्यात आली होती. २५ हजार ९९१ जणांची लस घेण्यासाठी नोंद झाली.
त्यानंतर १५ हजार १०५ फ्रंट लाईन वर्कर्सची नोंदणी झाली. दरम्यान ४५ ते ४९ वयोगटातील आजारी व्यक्तींची संख्या २९ हजार २६० एवढी आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांची संख्या एक लाख ४६ हजार ३०० एवढी आहे. या सर्वांना एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत लसीकरण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. आत्तापर्यंत ४६ हजार जणांना लसीकरण करण्यात आले आहे, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.
महापालिकेने ५० पेक्षा जास्त बाधित रुग्ण असलेल्या वॉर्डांना रेड झोनमध्ये टाकले आहे. असे १९ वॉर्ड असून, या वॉर्डांमध्ये लसीकरणावर भर दिला जाणार आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचे डोस ज्येष्ठ व आजारी नागरिकांना दिले जातील, असे डॉ. पाडळकर यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यात 18 वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लसीकरणाची परवानगी मिळणार ?
- कामे सुरु करण्यासाठी संघर्ष समितीचे पत्र अभियान
- औरंगाबादकरांनी पाळला उत्स्फूर्त लॉकडाऊन, परवानगी असलेले दुकानेही बंद
- पोटापेक्षा आरोग्याची काळजी! मुभा असतानाही कामगारांनी पाळला लॉकडाऊन
- ‘काही मंत्री मराठा समाजाविरोधात षडयंत्र रचत आहेत’, मेटेंचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

