🕒 1 min read
पिंपरीचिंचवड : कायदा आणि सुव्यवस्था राखणे, आपल्या कर्तव्यावर कायम तत्पर राहणारे अधिकारी आणि पोलीस अधिकारी समाजासमोर नेहमीच आदर्श निर्माण करतात. असेच अधिकारी म्हणजे पिंपरीचे पोलीस आयुक्त असलेले कृष्ण प्रकाश
यांचा गुन्हेगारी जगतात चांगलाच दबदबा आहे. ते ज्या ठिकाणी कार्यरत असतात तिथे कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारांवर मोठा वचक असतो. त्यांनी त्याच्या आत्तापर्यँतच्या सेवेत कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता आपल्या धडाकेबाज कामाने दखल घेण्यास भाग पाडले आहे.
जगात सर्वात खडतर समजली जाणारी फ्रान्समधील ट्रायथलॉन स्पर्धा यंदा आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी जिंकली आहे. अभिनेता मिलिंद सोमण यांच्यानंतर लोहपुरुषाचा हा किताब पटकावणारे ते दुसरे भारतीय, तर भारतातले पहिले पोलीस अधिकारी ठरले आहेत. फ्रान्समधील ट्रायथलॉन या स्पर्धेत कृष्णप्रकाश यांनी 3.86 किलोमीटर पोहणे, 42 किलोमीटर धावणे आणि 180 किलोमीटर सायकलिंग हे अवघ्या 14 तास 8 मिनिटात पूर्ण केलं.
त्यांच्या कार्य बद्दल त्यांना आयर्न मॅन किताब पटकविल्याबद्दल पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड, लंडनमध्ये समावेश करण्यात आला आहे. आयपीएस – आयएएस, संरक्षण दल, आर्म फोर्स, सनदी, पॅरामिलिटरीमधील वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारे कृष्ण प्रकाश हे देशातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचे सचिव अनुराग पांडेय, सचिव डॉ. प्रदीप मिश्र यांच्या हस्ते कृष्ण प्रकाश यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ब्रिटीश संसदचे सदस्य वीरेंद्र शर्मा, आलोक शर्मा, वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स इंग्लंडचे चेअरमन डॉ. दिवाकर सुकुल व वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स इंग्लंडचे भारतातील अध्यक्ष तथा दिल्ली उच्च न्यायालयातील वकील संतोष शुक्ला आदींनी कृष्ण प्रकाश यांना हा बहुमान मिळाल्या बद्दल शुभेच्छा दिल्या
महत्वाच्या बातम्या
- ‘बहुजन समाजातून आलेल्या धनंजय मुंडेंना भयंकर त्रास झाला, त्याला वाली कोण ?’
- आरटीई प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहिर
- ‘चलो बुलावा आया है’ प्रसिद्ध भजन गाणारे भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं निधन
- काँग्रेस स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार : नाना पटोले
- पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : चारचाकीतून प्रवास करताना आता मास्कची गरज नाही ! मात्र…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
