🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांनी अवघ्या पाच महिन्यांत उपमहापौरपदाचा राजीनामा दिला आहे. घोळवे यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे शुक्रवारी उपमहापौरपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, महापौरांनी तो मंजुरीकरता आयुक्तांकडे पाठविला आहे.
केशव घोळवे यांची ६ नोव्हेंबर २०२० रोजी उपमहापौरपदी निवड झाली होती. त्यांना केवळ पाच महिन्यांचा कार्यकाळ देण्याचे पक्षांतर्गत ठरले होते. आज (शनिवारी) त्यांचे पाच महिने पूर्ण होत आहेत. पक्षाने दिलेली मुदत संपल्याने, तसेच वैयक्तिक कारणाने घोळवे यांनी राजीनामा दिला आहे. ‘घोळवे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला असून, तो पुढील कार्यवाहीसाठी आयुक्तांकडे पाठवला आहे,’ असे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले.
माझ्या काही वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून उपमहापौरपदाची जबाबदारी दिली. या काळात शहरातील वंचित, गरीब, कामगार वर्गासाठी काम करता आल्याचे समाधान वाटते. असं राजीनामा दिल्यानंतर केशव घोळावे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- प. बंगालमध्ये राजकीय भूकंप; माजी मंत्र्याने केला भाजपात प्रवेश, 76 नेते ममतांची साथ सोडण्याच्या तयारीत
- विकेटच्या मागून एवढी बडबड का करतोस? पंतने दिलं अभिमानास्पद उत्तर
- मनसुख हिरेन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल ना ?, चित्रा वाघांचा ठाकरे सरकारला सवाल
- ‘हा दिनो मोरिया कोण आहे? हा सरकारचा जावई आहे का?’
- मनसुख हिरेन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल ना ?, चित्रा वाघांचा ठाकरे सरकारला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
