मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली व धमकीपत्र असलेली कार आढळल्याने खळबळ उडाली असतानाच शुक्रवारी या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदराजवळ सापडला आणि या प्रकरणाला गंभीर वळण लागले. मनसुख बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती.
महत्त्वाचं म्हणजे हिरेन यांच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव घेतलं जात असून या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात यावा, अशी मागणी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या घटनेसंबंधी शंकेला अनेक पुरावे समोर आल्याचंही फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले
कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी
आणि
आता मनसुख हिरेन…
प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य…..
आणि
रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणार्या गोष्टी…….सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना…?
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 5, 2021
त्यानंतर आता भाजप नेत्या आणि प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल ना ? असा सवाल ठाकरे सरकारला केला आहे. ‘महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन… प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य… आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी… सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना…?’ अस ट्विट करत चित्रा वाघ यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मृत्युपूर्वी हिरेन यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते पत्र; पत्रातून झाला धक्कादायक खुलासा
- ‘कायदा सर्वोच्च, त्याच्याशी बांधील राहिलं पाहिजे’ तापसीच्या प्रियकराला केंद्रीय क्रीडा मंत्र्याचं प्रतिउत्तर !
- नाशिकमध्ये भाजप-मनसेची युती ? ; भाजपच्या बड्या नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील लॉकडाउन ३१ मार्चपर्यंत
- पंकजा मुंडे मतदारसंघात सक्रिय; पक्षातील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न


