Share

विकेटच्या मागून एवढी बडबड का करतोस? पंतने दिलं अभिमानास्पद उत्तर

Published On: 

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातकडे सर्वांचे लक्ष आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा आपल्या मजेशीर स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतो. मैदानावर काही वेळा संघसहकार्‍यांसोबत त्याचे चाललेले विनोदी संभाषण तर कधी विरुद्ध खेळाडूंसोबत चाललेली स्लेजिंग सोशल मीडियावर कायमच वायरल होत असते.

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज रिषभ पंतने शानदार शतक ठोकले. पंतने 118 चेंडूत 101 धावा केल्या. या खेळीत पंतने 13 चौकार आणि 2 षटकार लगावले. रिषभ पंतच्या या खेळीचे कौतुक होत आहे. या धमाकेदार डावाचे केवळ भारतच नव्हे तर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनीही कौतुक केले आहे.

काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्माने पंतला त्याच्या शतकाबद्दल विचारले. तसेच तो विकेटकिपिंग करताना सारखा काही ना काही बडबडत असतो त्याच्याबद्दल विचारणा केली. त्यावर पंतने जे उत्तर दिले त्याने सर्वांची मने जिंकली.

रोहित शर्माने पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांची एक छोटी मुलाखत घेतली. याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला. जेव्हा रोहितने पंतला विचारले, तु विकेटच्या मागे सारखा काही ना काही बडबडत असतो, असे लोक म्हणतात. विकेटच्या मागे का इतका दंगा करतोस? यावर पंत म्हणाला, मी क्रिकेटचा आनंद घेत असतो. यामुळे संघाचा आत्मविश्वास देखील वाढतो. माझा प्रयत्न असतो की कशाही पद्धतीने संघाला मदत झाली पाहिजे. डोक्यात फक्त तेच सुरू असते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!