🕒 1 min read
मुंबई – राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारकडून होणारा भ्रष्टाचार फक्त मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनच चालतो असे मानण्याचे काही कारण नाही. तसे असते तर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयटी इमारतीसमोरील वैभव चेंबर्समध्ये अधिकाऱ्यांच्या रांगा का लागतात, त्यांना तिथे का जावे लागते? असा सवाल भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी केला.
हे सरदेसाई कोण?
राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था, भ्रष्टाचार आदी विषयांवर विधानसभेत झालेल्या चर्चेत ते बोलत होते. या सरकारच्या काळात राजरोसपणे भ्रष्टाचार होत आहे. वरूनच आलेले असे हे सरदेसाई कोण आहेत? त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षाव्यवस्था कशाला? त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे? अधिकाऱ्यांना त्यांचे फोन का जातात? कंत्राटदारांना, ठेकेदारांना ते का फोन करतात, याची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत, असे ते म्हणाले.
रिझवी कॉलेजजवळ गाड्यांच्या रांगा का?
जंबो कोविड सेंटरच्या माध्यमातून, तर भ्रष्टाचाराचे धिंडवडे निघाले आहेत. यामध्ये पुरवले जाणारे ब्लँकेट, फॅन आदी वस्तूंचा पुरवठा कोणाच्या इशाऱ्यावरून होतो? वांद्रे येथील कार्टर रोडवरील रिझवी कॉलेजच्या बाजूला असलेल्या बंगल्यावर गाड्यांच्या रांगा का लागतात? नाईटलाईफ गँग येथे कार्यरत का राहते? हा दिनो मोरिया कोण आहे? दोन-चार चित्रपट त्याचे निघाले. हा सरकारचा जावई आहे का? मुंबई महापालिका, सरकारचे अधिकार याला कोणी दिले? हा कोणाचा मित्र आहे? चेतन कदम, आदित्य झव्हेरी, गोम्स यांचा कोविड सेंटरशी काय संबंध? तेथे काय लागते हे ठरवणारे हे कोण? असे सवालही आ. राणे यांनी केले.
पाच आणि आठ आवडीचे आकडे…
पाच आणि आठ हे आकडे यांच्या जास्त आवडीचे आहेत. ते दिवस आहेत, तास आहेत की टक्के आहेत, हे आपण ठरवा. तिथे सायन हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या बेडच्या बाजूला डेडबॉडी ठेवली जाते. टेंडर काढायचे नाहीत. राजरोस चोरी करायची, हे आम्ही चालू देणार नाही. आम्ही गप्प बसणार नाही. यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत.
धारावी मॉडेलचे श्रेय आरएसएसचे
कोरोना मुक्त धारावी मॉडेलचे सरकार कौतुक करते. याचे श्रेय मुंबई महापालिकेला अजिबात नाही. त्यांना आयुक्त बदलावा लागला. हे सारे श्रेय आरएसएससारख्या स्वयंसेवी संस्थांचे आहे. त्यांनी काम केले म्हणून हे झाले. आम्हीही मुंबईत राहतो. आम्हालाही समजते. आम्ही काही लंडन, अमेरिकेत राहत नाही, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मृत्युपूर्वी हिरेन यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते पत्र; पत्रातून झाला धक्कादायक खुलासा
- मराठवाड्यात ऑक्सिजन टँक वाढवण्याच्या विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांच्या सूचना
- स्वॅब न देताच रुग्ण येत आहेत कोरोना पॉझिटिव्ह; बुलढाण्यातील अजब प्रकार समोर !
- पंकजा मुंडे मतदारसंघात सक्रिय; पक्षातील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न
- औरंगाबादकरांनो काळजी घ्या! २४ तासांत ४५९ नव्या रुग्णांची नोंद; पाच जणांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
