Share

प. बंगालमध्ये राजकीय भूकंप; माजी मंत्र्याने केला भाजपात प्रवेश, 76 नेते ममतांची साथ सोडण्याच्या तयारीत

Published On: 

नवी दिल्ली- पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी यांची अनेक दिग्गज नेते साथ सोडून जात असल्याचे चित्र आहे मात्र आता ममता यांना आणखी एक तगडा झटका बसला आहे.

टीएमसीच्या 76 नेत्यांनी थेट भाजप नेत्यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.तर दुसरीकडे ममता दीदींचे विश्वासू सहकारी आणि, माजी रेल्वे मंत्री, माजी खासदार दिनेश त्रिवेदी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ममता बॅनर्जींसाठी हा मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, काल पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींनी सर्व 291 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उमेदवारांची यादी जाहीर केलेला तृणमूल पहिलाच पक्ष आहे.TMC च्या यादीत 100 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

यंदा तृणमूलकडून 50 महिला आणि 42 मुस्लिम उमेदवारांना संधी मिळाली आहे. ७९ अनुसूचित जातीमधील उमेदवार आणि १७ अनुसूचित जमातीमधील उमेदवार असल्याची माहिती दिली आहे.तृणमूल दार्जिलिंगच्या 3 जागांवर आपले उमेदवार उतरवणार नाही, या जागा सहयोगी पक्षासाठी सोडण्यात आल्या आहेत.

यानंतर आता तिकीट न मिळाल्याने पक्षात मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे या नाराजांनी आता थेट भाजप नेते मुकुल रॉय यांची भेट घेऊन भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या 76 नाराजांमध्ये माजी आमदारही आहेत. तसेच ज्या 28 आमदारांचे तिकीट कापण्यात आले ते सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!