Share

गांधीजींच्या हत्येची पुन्हा चौकशी नाही

Published On: 

नवी दिल्ली: गांधीजींच्या हत्येची पुन्हा चौकशी व्हावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती मात्र सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या अमॅकस क्युरी अर्थात न्यायालयीन मित्र अमरेंद्र शरण यांनी उत्तर दाखल करुन, गांधीजींच्या हत्येची पुन्हा चौकशी करण्याची गरज नसल्याचं सांगितलं सांगितलं आहे .

गांधीजींच्या हत्येची पुन्हा चौकशी व्हावी यासाठी मुंबईतील अभिनव भारतचे ट्रस्टी डॉ. पंकज फडणीस यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.गांधीजींच्या हत्येमागे परदेशी एजन्सीचा हात असू शकतो, असा संशय डॉ. फडणीस यांनी याचिकेद्वारे व्यक्त केला होता नथुराम गोडसेने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींवर जवळून गोळीबार करुन हत्या केली होती. मात्र या प्रकरणाची पूर्ण चौकशी न करता, त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला होता, असा दावा डॉ. पंकज फडणीस यांनी केला होता.सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या याचिकेवरुन अनेक प्रश्न विचारले होते. तसंच ज्येष्ठ अधिवक्ते अमरेंद्र शरण यांची अमॅकस क्युरी म्हणून नियुक्ती केली होती.अमॅकस क्युरी अमरेंद्र शरण म्हणाले, “याआधीही याप्रकरणी संपूर्ण चौकशी झाली आहे. गांधीजींच्या हत्येमागे विदेशी हात असल्याचा, दोघांनी गोळीबार केल्याचा किंवा त्यांना चार गोळ्या लागल्याच्या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नाही”.

अमॅकस क्युरी म्हणजे काय?
एखाद्या क्लिष्ट प्रकरणात न्यायालय स्वत: वरिष्ठ वकील किंवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञाची नियुक्ती करते. प्रत्येक न्यायाधीशाला सर्वच विषयाची इत्यंभूत माहिती असतेच असं नसतं. त्यामुळे कोर्ट अमॅकस क्युरी अर्थात न्यायालय मित्राची नियुक्ती करते.ही व्यक्ती संबंधित प्रकरणाच्या न्यायदानासाठी मदत करते. पण ही व्यक्ती त्या प्रकरणाशी संबंधित खटल्यामध्ये कोणत्याही अशिलाचा वकील नसते.ही व्यक्ती संबंधित खटल्याचा अभ्यास करुन न्यायालयाला वेळोवेळी माहिती देऊन अहवाल सादर करते. त्यालाच अमॅकस क्युरी अथवा न्यायालयीन मित्र म्हणतात.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!