🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारच्या वतीने देशातील काही पत्रकार आणि महत्त्वाच्या व्यक्तींचे फोन क्लोन करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संबंधीत पेगॅसिस सॉफ्टवेअरचा वापर झाल्याचा दावाही काही मीडियाने केला आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातही फडणवीस सरकारच्या काळात फोन टॅपिंग झाली होती, असा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे.
या संबंधी सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिन सावंत यांनी केंद्रातील मोदी आणि तत्कालिन फडणवीस सरकारवर टीका केलीय. ते म्हणाले की, ‘पेगॅसस कांड महाराष्ट्रात ही झाले का? याची चौकशी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करावी अशी मागणी आहे. महाराष्ट्रात या आधीच फडणवीस सरकारच्या काळातील रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु पेगॅसिस सॉफ्टवेअर च्या वापराच्या बातम्या ही येत होत्या कितींदा कोण अधिकारी इस्त्रायल ला गेले? NSO बरोबर शासकीय मिटींग झाल्या होत्या का? NSO शी कोणता पत्रव्यवहार झाला होता का?’ असे पश्न सावंत यांनी उपस्थित केले असून याची माहिती समोर आणण्याची मागणी केली आहे.
देशात पेगॅसिस सॉफ्टवेअर च्या माध्यमातून फोन टॅपिंग व त्यात मोदी सरकारची भूमिका हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. सर्व भाजपा शासित राज्य सरकारांना या कार्यपद्धतीवर काम करण्याचे निर्देश दिले असतील. महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या काळात झालेले फोन टॅपिंग यामागे समान मानसिकता व हेतू आहे
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 19, 2021
त्याच बरोबर ते म्हणाले की, ‘या अगोदर ही अशा चौकशीची मागणी करण्यात आली होती. दिग्विजय सिंग यांनीही मागणी केली होती. देशात पेगॅसिस सॉफ्टवेअर च्या माध्यमातून फोन टॅपिंग व त्यात मोदी सरकारची भूमिका हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. सर्व भाजपा शासित राज्य सरकारांना या कार्यपद्धतीवर काम करण्याचे निर्देश दिले असतील. महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या काळात झालेले फोन टॅपिंग यामागे समान मानसिकता व हेतू आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पेगासस’साठी एवढा निधी आला कोठून? की त्यातही नवीन कांड आहे?; आव्हाडांचा सवाल
- राजकीय खळबळ! ‘पेगासस’च्या मदतीने ३०० प्रतिष्ठित नागरिकांवर केंद्राची हेरगिरी
- अनिल देशमुख यांच्या काटोलमधील घरांमधून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
- ईडीच्या रडारवर असलेले अनिल देशमुख अटकेच्या भीतीने ‘नॉट रिचेबल’
- नंदुरबार अपघात; पंतप्रधान मोदींकडून मराठीत ट्विट करत मदत जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
