Share

T20 Blast : …अन् संतापलेल्या कार्लोस ब्रेथवेटनं फलंदाजांना मारला चेंडू; VIDEO व्हायरल!

Published On: 

मुंबई : वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रेथवेटने टी-२० ब्लास्ट २०२२ (T20 Blast) स्पर्धेमध्ये खेळताना लाइव्ह मॅचदरम्यान असे कृत्य केले आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे.  ब्रेथवेटने फलंदाजाला चेंडू मारला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर अंपायर संतापले आणि त्याचवेळी ब्रेथवेटच्या संघाला ५ धावांचा दंड ठोठावला. जेव्हा अंपायरने दंड ठोठावला, तेव्हा ब्रेथवेटला धक्काच बसला आणि त्याने केलेल्या कृतीबद्दल बोलू लागला. पण अंपायरने त्याचे ऐकले नाही.

ब्रेथवेटच्या चेंडूवर फलंदाजाने सरळ फटका मारला जो थेट त्याच्याकडे गेला. ब्रेथवेटला असे वाटले, की फटका खेळूनही फलंदाज आपल्या क्रीजच्या बाहेर आहे. अशा स्थितीत ब्रेथवेटने कोणताही विचार न करता चेंडू फलंदाजाच्या दिशेने फेकला. त्यामुळे चेंडू फलंदाजाच्या पायाला लागला. त्यानंतर फलंदाजाने अंपायरकडे बोट दाखवत ब्रेथवेटच्या या कृतीची तक्रार केली. अशा स्थितीत मैदानावरील दोन्ही पंचांनी आपसात चर्चा केली आणि त्यानंतर ब्रेथवेटच्या संघाला ५ धावांचा दंड ठोठावला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या प्रकरणावर गोलंदाजाला डिमेरिट पॉइंट्ससह दंडही ठोठावला जातो. आयपीएलमध्ये खेळाडूला वॉर्निंग मिळते आणि त्याला दंड भरावा लागतो. पण टी-२० ब्लास्ट आणि पाकिस्तान सुपर लीगने एमसीसीचा नियम स्वीकारला आहे. त्यामुळे ब्रेथवेट आणि त्याच्या संघाला ५ धावांचा दंड ठोठावण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!