Share

श्रीलंका-इंग्लंड टी-20 मालिकेतील सामनाधीकारी फिल यांना कोरोनाची लागण

Published On: 

मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. यानंतर आता इंग्लंडमध्ये श्रीलंका आणि इंग्लंड संघादरम्यान झालेल्या टी-20 मालिकेत सामनाधीकारी फिल यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

56 वर्षीय फिल व्हिटीकेस यांनी इंग्लंड आणि श्रीलंका संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेत सामनाधिकारी म्हणून काम बघितले होते. त्यांना कोरोनाची कोणती लक्षणे नाही मात्र त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल हा सकारात्मक आला. या सामन्याशी निगडीत 7 सदस्य फिल यांच्या संपर्कात होते. फील यांनी 10 दिवसासाठी स्वत:चे विलगीकरण करुण घेतले आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली.

फील यांच्या संपर्कात असलेल्या लोकांनी स्वत:ला 10 दिवसासाठी विलगीकरण करुन घेतले आहे. इंग्लंड आणि श्रीलंका संघाच्या कोणत्याही सदस्याला लागण झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच आगामी एकदिवसीय मालिकेवर याचा काहिच परिणाम होणार नसल्याचेही क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!