पुणे: आर्यन खान प्रकरणामधील तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आल्यानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज सकाळी पुन्हा एक ट्वीट करत खळबळ निर्माण केली आहे. यावरच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यामध्ये बोलताना मलिक यांना मंत्री मंडळातून काढून टाकल्याचा खोचक टोला लगावला आहे.
यावेळी त्यांनी म्हटले की, मंत्र्यानेच एसआयटीची मागणी करणं हे थोडं विचित्र आहे. नवाब मलिकांनी बहुतेक मंत्रीमंडळामधून राजीनामा दिलाय. तुम्ही जर मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री आहात तर तुम्ही प्रेसच्या माध्यमातून का मागणी करताय असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच संपूर्ण सरकार तुमच्या हातात आहे. एक गृहमंत्री जरी जेलमध्ये गेले तरी दुसरे गृहमंत्री आजारी होते ते काल बरे झालेत. तुमच्याकडे सगळी सत्ता आहे. एसआयटी नेमा नाहीतर डबल एसआयटी नेमा. रोज सकाळी उठून ट्विट करा, प्रेस घ्या; म्हणजे मंत्रीमंडळातून तुम्हाला काढलेलं दिसतंय. मंत्रीमंडळातून काढलेल्या माणसानेच मागणी करायची असते. असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान आज सकाळीच नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं आहे, असा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आर्यन खान प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मी मागणी केली होती. त्यानंतर एक नव्हे तर दोन एसआयटी स्थापन करण्यात आल्या आहेत. एक राज्य सरकारने आणि दुसरी केंद्र सरकारने स्थापन केली आहे. आता कोण वानखेडेंचा आणि त्यांच्या खासगी आर्मीचा पर्दाफाश करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, मात्र यावेळी त्यांनी पहिल्यांदाच वानखेडेंवर आर्यन खानच्या अपहरणाचा आरोप केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोर्टाने वानखेडेंची ‘ती’ याचिका फेटाळली, देशाला सत्य कळायला हवे- नवाब मलिक
- समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं; मलिकांचा गंभीर आरोप
- कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा भाडखाऊ गुलाबाने कव्वाली गात राहावी-नितेश राणे
- ‘इंधन करातून २३ लाख कोटी रूपये कमविले’; पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका
- आठवड्यातून एकदा नमाज अदा करणं कुणाच्या भावना कसं दुखावू शकतं-असदुद्दीन ओवैसी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

