Share

“महाराष्ट्राविषयी द्वेष असणाऱ्या लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेतच बोलावं”, संजय राऊतांचे ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

Published On: 

नागपूर: शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut)  यांनी काल (२० फेब्रुवारी) भाजप नेते किरीट सोमय्या(BJP leader Kirit Somaiya) यांच्याबाबत अपशब्द काढले होते. आपल्या वक्तव्याबाबतच आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्प्ष्टीकरण दिले आहे.

संजय राऊत म्हणाले की, “जे महाराष्ट्र द्रोही आहेत, जे मराठी द्वेष्टे आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत आणि ज्यांच्या मनात महाराष्ट्राविषयी द्वेष आहे, अशा लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेतच बोलावं असं आमचे संत सांगून गेले आहेत.” यावेळी त्यांनी ‘तुका म्‍हणे ऐशा नरा। मोजून माराव्या पैजारा’ असे म्हणत आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले.

तसेच एखादा महाराष्ट्रद्रोही राजकीय पक्षाचा बुरखा घालून आमच्यावर ठुमकत असेल तर मला वाटतं मी खूपच सौम्य भाषा वापरली आहे. असेही राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी कॉंग्रेस सोबतच्या आघाडीबाबतही विधान केले आहे. ते म्हणाले की, “आम्ही हे कधीच नाही म्हणालो की, काँग्रेस शिवाय आघाडी बनवायची आहे. जेव्हा ममता बॅनर्जींनी असं सूतोवाच केलं होतं तेव्हा शिवसेना पहिला पक्ष होता ज्यांनी काँग्रेससोबतच नवी आघाडी बनली पाहिजे, असे म्हटले होते.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!